वार्षिक क्रीडा सप्ताह

लहान वयात क्रीडा व खेळ विद्यार्थ्यांच्या शारीरिक,नसि माक आणि सामाजिक विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात.

खेळ म्हणजे फक्त करमणूक नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी आहे .याच उद्देशाने शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार कला व क्रीडा कौशल्य याची प्रगती व्हावी म्हणून दि. १९/१/२०२६ ते २२/१/२०२६ पर्यंत शाळेच्या क्रीडांगणावर वार्षिक क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला.
मा. मुख्याध्यापिका जोशी मॅडम यांनी मशाल ज्योतीचे पूजन केले. व विद्यार्थ्यांना अगामी खेळासाठी शुभेच्छा दिल्या .
विविध स्पर्धा जसे की धावणे, बेडूक उडी, कासव शर्यत, गोणी उड्या, खुर्ची खालून सरकत जाणे इ. स्पर्धा घेण्यात आल्या.
अशा प्रकारे हा क्रीडा सप्ताह विद्यार्थ्यांच्या आनंदाने व मोठ्या उत्साहाने शाळेच्या क्रीडांगणावर पार पडला.

Scroll to Top