विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे मुख्याध्यापिका मा. सौ. सोमण मॅडम, शिक्षकवृंद तसेच पालकांनी मनापासून कौतुक केले. विद्यालयातील अशा प्रदर्शनांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो व त्यांच्यातील सर्जनशीलता व संशोधन वृत्ती विकसित होण्यास मदत होते असा विश्वास मा.मुख्याध्यापिका सोमण मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
विज्ञान प्रदर्शन ( माध्यमिक विभाग – मराठी माध्यम )
म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न
गुरुवार, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी म. ए. सो. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.सौ. समिता सोमण मॅडम यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते ९ वी मधील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व उपयुक्त प्रकल्प सादर केले होते. यामध्ये प्रकाशीय उपकरणे, जल व्यवस्थापन, जलशुद्धीकरण, जलचक्र (Water Cycle), कार्बन शुद्धीकरण (Carbon Purification for Factories), फुफ्फुसांचे कार्य (Function of Lungs), पेशींचे प्रकार (Types of Cells), व्हॅक्युम क्लिनर, पवनचक्की अशा अनेक प्रतिकृतींचा समावेश होता.






















