पूर्व प्राथमिक विभागात बनी टमटोला हा उपक्रम घेण्यात आला.
चिमुकल्याचे शिक्षण , आनंददायी, खेळकर व अर्थपूर्ण बनवण्यासाठी,
सर्व विद्यार्थ्यांना प्रथम बनीचे एप्रोन घालण्यात आले नंतर शाळेच्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांसमवेत बनीटमटोला या उपक्रमाची प्रार्थना घेण्यात आली.
नंतर विविध प्रकारच्या गटांमध्ये हे कार्य पार पाडले, जसे की विद्यार्थ्यांकडून शाळेच्या आवारातील झाडांना पाणी घालून निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तसेच क्रीडांगणातील साफसफाई करत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, तसेच मुलांमध्ये एकाग्रता, शांतता व शारीरिक मानसिक ,आरोग्य उत्तम राहण्यासाठी, “योग्य” साधना करून घेतली, त्यामध्ये “अनुलोम- विलोम” तसेच “कपालभारती” हे श्वासाचे प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले. अशा प्रकारे बनी टमटोला या उपक्रमातून दर आठवड्याला, प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची छोटी छोटी कामे करून घेतली जातात.






