म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल
इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींसाठी इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांचे विद्यमाने *मुलींसाठी स्व-संरक्षणाचे व्याख्यान आणि त्या संदर्भात काही प्रात्यक्षिक* दाखविण्यात आले.या उपक्रमात इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट डॉक्टर अक्षता नाईक , मार्गदर्शक निंबाळकर मॅडम, प्रात्यक्षिक प्रमुख ननावरे मॅडम, त्यांचे सहकारी वर्षा ठाकूर, प्रिया ठाकूर, तांडेल मॅडम सहभागी झाल्या होत्या. तत् प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रचना पाटील मॅडम, विद्यार्थी सुरक्षा समितीच्या प्रमुख जाधव मॅडम उपस्थित होत्या. *उपस्थितांना विद्यार्थिनींनी तयार केलेले पर्यावरण पूरक कागदी पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा कार्ड* देऊन स्वागत करण्यात आले.



