दिनांक १/०८/२०२६ शनिवार म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल .मराठी माध्यम माध्यमिक विभाग पर्यावरणपूरक उपक्रम अंतर्गत ‘सीडबाॅल्स तयार करणे व त्यांची निसर्गात रुजवणूक करणे’.
महाराष्ट्र ऐज्युकेशन सोसायटी पुणे,संचलित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)२०२० अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरुकता,पर्यावरण संवर्धन व संगोपन या मूल्यांची रुजवणूक व्हावी या उद्देशाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व समाजजागृती करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या दिनाचे औचित्य साधून सीडबाॅल्स तयार करणे व निसर्गात त्यांची रूजवणूक करणे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी शालेय परिसराच्या जवळच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणा-या रिकाम्या जागेवर विद्यार्थ्यांनी सीडबाॅल्स टाकले. यात इयत्ता पाचवी ते नववी सर्व इयत्तांच्या प्रत्येक तुकडीतील प्रातिनिधिक स्वरूपात ५ विद्यार्थी असे एकूण ५० वीद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमात सहभागी होताना विद्यार्थ्यांनी पावसाळ्यातील रिमझिम पडणारा पाऊस थंडगार अल्हाददायक वारा या निसर्गाचा अनुभव देखील घेतला .तसेच चालत गेल्याने विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम सुध्दा झाला.सदर उपक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले.सर्व वर्गांचे वर्गशिक्षिक, विद्यालयाचे समुपदेशक तसेच सेवक वर्ग यांचाही या उपक्रमात सहभाग होता.















