म .ए .सो .फडके विद्यालयात विज्ञान खेळणी कार्यशाळा संपन्न.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळावर दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यालयात मराठी विज्ञान परिषदे तर्फे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ” विज्ञान खेळणी कार्य शाळेचे ” आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेत हवेचा रोध, गुरुत्व मध्य, स्थितीज-गतीज ऊर्जा, घर्षण, दृष्टी सातत्य अशा विविध तत्त्वांवर आधारित भिंगर मासा, स्ट्रॉ मॅन, पुठ्ठ्याचा फटाका, चढणारे कासव, कुंडीतील झाड अशा प्रकारची दहा खेळणी सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः केली.
मार्गदर्शक मा.चारुशीला जुईकर यांनी प्रत्येक खेळणे करत असताना अतिशय रंजक पद्धतीने त्या मागचे वैज्ञानिक तत्व सहज पणे सांगितले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून खेळणी निर्मितीचा आनंद लुटला.सदर कार्य शाळेत ५ वी ते ८ वी चे ७२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यालयाच्या वतीने स्वाती बापट यांनी मा.जुईकर मॅडम यांचे स्वागत केले. या वेळी सर्व विज्ञान शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने विज्ञान खेळणी कार्य शाळेत आनंद घेत होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.समिता सोमण यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या खेळण्यांबद्दल त्यांचे कौतुक केले आणि एकूण कार्य शाळे बद्दल समाधान व्यक्त केले.














