म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल.
शुभास्ते पंथान: – निरोप नव्हे शुभंकर वाटचालीच्या शुभेच्छा !!!
सोमवार दि .२ फेब्रुवारी फेब्रुवारी २०२६ रोजी म. ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात “शुभास्ते पंथान:” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
‘निरोपाचा क्षण नव्हे,शुभेच्छांचा वर्षाव आहे,
पाऊल बाहेर पडताना,रेंगाळणारे मन आहे.’
या उक्ती प्रमाणेच माध्यमिक शालान्त परीक्षेस प्रविष्ट होऊन, आपल्या शालेय जीवनाचा अंतिम टप्पा पार करत असताना विद्यार्थ्यांचा ‘निरोप समारंभ’ न करता त्यांना त्यांचा भविष्यातील प्रवास,’ पथ’.. ..’वाट ‘शुभंकर होवो अश्या आशीर्वादरुपी शुभेच्छा देणारा शुभास्ते पंथानः हा विद्यालयाचे वेगळेपण जोपसणारा कार्यक्रम .
कार्यक्रमाची सुरुवात शाला गीताने झाली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ . सोमण मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “आत्मविश्वास, प्रयत्न , जिद्द व चिकाटी ही विद्यार्थी जीवनातील बलस्थाने आहेत, हे अधिक प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्या करिता मॅडम यांनी सुंदर, प्रेरणादायी स्वरचित कविता विद्यार्थ्यांना ऐकवली. त्यांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.
या वेळी इयत्ता १०वी तील काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या शालेय जीवनातील आठवणींचा पट व्हिडिओ रूपाने इयत्ता दहावी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उलगडला .
तसेच विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर केले. शैक्षणिक स्पर्धेमध्ये सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिके देऊन कौतुक करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ . सोमण यांनी आयुष्यातील या महत्त्वपूर्ण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .आशयपूर्ण ध्येयगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


















