प्रवेशोत्सवाचा आनंददायी क्षण!
म. ए. सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात आज विद्यार्थ्यांचा जल्लोषात प्रवेशोत्सव पार पडला. फुले, रांगोळी, स्वागतगीत तसेच मुख्याध्यापिका मा. निशा देवरे यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. आणि शालेय साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांचं मनोभावे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गुळ शेंगदाणे युक्त पौष्टिक लाडू खाऊ म्हणून देण्यात आला.शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मिळून नवीन शैक्षणिक वर्षाचा उत्साहात प्रारंभ केला.
#प्रवेशोत्सव #WelcomeStudents #शिक्षणाचा_उत्सव #school







