निसर्गाशी एकरूप होऊन झाडे ,फुले, प्राणी ,पक्षी , पाणी ,पहावे या उद्देशाने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाची शैक्षणिक सहल दि.१८/२/२०२६ रोजी शिवगंगा वॉटर पार्क येथे नेण्यात आली होती.
सहलीच्या दिवशी सर्व शिक्षक ,सेविका व विद्यार्थी वेळेवर शाळेत आलो व नंतर बसने वॉटर पार्क येथे गेलो. तिथे गेल्यावर प्रथम गोशाळेला भेट दिली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाण्यात खेळताना घ्यायची काळजी या याबद्दल थोडीशी माहिती दिली. वॉटर पार्क मध्ये विद्यार्थी लहान मुलांसाठी असलेल्या पुलांमध्ये खेळले. पाण्याच्या घसर गुंडीचा आनंद घेतला व पाण्यात विविध खेळ खेळले. नंतर सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक असे जेवण देण्यात आले. त्यांच्या वयाला अनुसरून असलेले ट्रेन, पाळणे, आकाश पाळणा, गोलाकार फिरणारे घोडे यावर बसून त्यांनी खेळाचा आनंद घेतला.
नंतर विद्यार्थ्यांना तेथील फळझाडे, औषधी झाडे यांची माहिती करून देण्यात आली तसेच बागेत त्यांना खेळण्यास दिले . त्यानंतर निघताना शंकराच्या देवळात नेण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना पॉपकॉर्न, आईस्क्रीम खाऊ देऊन बस मध्ये बसवण्यात आले.
५.३० सर्व विद्यार्थी शाळेत पोहोचले. अशाप्रकारे ही वॉटर पार्क ची सहल विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व उत्साही ठरली.

