सायबर सुरक्षा ( मराठी माध्यम – माध्यमिक विभाग )

मंगळवार दिनांक २१ जुलै रोजी विद्यालयात *सायबर सुरक्षा* या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यात आले. या व्याख्यानासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री.दत्तात्रय वणे व पोलीस हवालदार श्री. मनोज जाधव उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.रचना पाटील मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्रीटिंग कार्ड देऊन केले.
पोलीस उपनिरीक्षक श्री. दत्तात्रय यांनी सायबर सुरक्षा म्हणजे संगणक, मोबाईल, इंटरनेट किंवा इतर डिजिटल साधनांचा वापर करून केले जाणारे गुन्हे. आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक, बँक खात्यांची माहिती चोरणे, सोशल मीडिया खाते हॅक करणे, बनावट वेबसाइट तयार करणे, अश्लील किंवा खोटी माहिती पसरवणे अशा प्रकारचे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी मजबूत पासवर्ड वापरणे, ओटीपी (OTP) किंवा बँकेची गोपनीय माहिती कोणालाही न देणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, अधिकृत वेबसाइट व ॲप वापरणे आणि मोबाईल व संगणकातील सुरक्षा प्रणाली अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
सायबर गुन्हा झाल्यास त्वरित पुरावे जतन करून राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार करावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना दिली व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संस्थेच्या *हरित शाळा* उपक्रमांतर्गत पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचा शेवट
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. रचना पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून केले.

Scroll to Top