तुळशीच्या रोपांची विक्री

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात होणे आवश्यक आहे.यासाठी फडके विद्यालयातील विद्यार्थी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने जास्तीत जास्त ऑक्सीजन निर्मिती करणारी तुळस आणि याच तुळशीच्या रोपांची लागवड करून त्या रोपांची विक्री करण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचा पहिला प्रयोग करत आहेत . त्या अनुषंगाने विद्यालयाच्या प्रांगणात स्टॉल मांडून तुळशीच्या रोपांची विक्री करणार आहोत. 🙏आमच्या या प्रयत्नांना पालकांनी प्रतिसाद द्यावा आणि एक तुळशीचे रोप विकत घ्यावे.किंमत फक्त 20/-,25/-,30/-रुपये. येणार नां मग आमच्या स्टॉलवर🌱🤷‍♀️

Scroll to Top