आषाढी एकादशी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी पूजन बुधवार दिनांक २८जून२०२३ रोजी पालखी पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक प्रमुख सौ. रचना  पाटील व पालक प्रतिनिधींच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले.विद्यालयाच्या गानवृंदानी हरिनामाचा गजर करत भक्तीगीते सादर केली. टाळमृदुंगाच्या नादात माउली माउली नाम तुझे या भक्ती गीताने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले . इयत्ता ९ वी कणाद मधील कु . जिजा मोहिते हिने माहिती सांगितली . प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांची अभंग गीत गायन स्पर्धा घेण्यात आली . मराठी माध्यम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ . निशा देवरे व माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

https://photos.app.goo.gl/N6tCrbJz2MAb1wFJ6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’