इंद्रधनु

इंद्रधनु
दि. १५ सप्टेंबर २०२३

सप्तरंगांच्या सौंदर्याची होऊन कमान
चिमुकल्यांच्या गुणांची वाढवूया शान

ज्याप्रमाणे इंद्रधनुष्य सात रंगांचे बनलेले असते त्यामुळेच त्याच्या सौंदर्यात अधिक वाढ झालेली असते त्याचप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले विविध सूप्त गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व हे खुलत असते. अशाच व्यक्तिमत्वांना अधिक पैलू पाडण्यासाठी इंद्रधनुच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . इयत्ता चौथी सायली व अबोली या वर्गाच्या इंद्रधनु या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेले सुगंधित पुष्प शिक्षक व पालक प्रतिनिधींना देऊन संपूर्ण वातावरण सुगंधित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. सदर कार्यक्रमासाठी पावसाळा हा विषय घेऊन पावसाळ्यात येणारे विविध सण, समारंभ त्याचप्रमाणे पावसाळ्यात घ्यावयाची काळजी तसेच विविध रानभाज्या व त्यांचे महत्त्व असे अनेक विषय विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य ,नाटिका व एकांकिका या माध्यमातून सादर केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील विविध उपक्रम व त्यांचे महत्त्व तसेच पावसाळ्यात घ्यावयाची काळजी यावर भाष्य केले. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या दिग्दर्शनाने बसविण्यात आला होता. पालकांनी विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. मुख्याध्यापिका देवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. अशा प्रकारे हा कार्यक्रम आनंदात ,उत्साहात संपन्न झाला.

https://photos.app.goo.gl/wRtgeEYBAExrFCwu5

Leave a Comment