गुरुपौर्णिमा- मराठी माध्यमिक विभाग

म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, न. पनवेल
(माध्यमिक विभाग मराठी माध्यम)
सोमवार २२ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण‌ यांच्या हस्ते, महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका व सांस्कृतिक प्रमुख .सौ.बापट तसेच सहाय्यक शिक्षिका सौ.इनामदार
यांनी “गुरुपौर्णिमा”याविषयी माहिती सांगितली. तसेच इयत्ता १० वी राजा शिवाजी या वर्गामधील कुमारी अनुराधा पवार हिने विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरेवर आधारित सुंदर, बोधपर गोष्ट सांगितली.
मुख्याध्यापिका सोमण मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आपल्या आयुष्यात गुरुला असणाऱ्या अनन्यसाधारण महत्वा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच गुरुमहिमा वर्णन करणारी संत श्री नामदेव महाराजांची सुंदर बोधप्रत गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ग्रंथालयात
शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड जोपासणाऱ्या “माझे ग्रंथालय” यास्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://photos.app.goo.gl/7y7yn57Ek99LVCBQ8

 

Leave a Comment