शेकोटी व शब्द पतंग महोत्सव

बुधवार दिनांक ०८.०२.२०२३ रोजी विद्यालयात शब्दपतंग महोत्सव  व शेकोटी कार्यक्रमाचे आयोजन आले . मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांच्या  मार्गदर्शनानुसार पुठ्ठ्यांचे पतंग तयार करून त्यावर शब्द व वाक्यांचे लेखन करून विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेतले . तसेच प्रत्यक्षरीत्या कागदी पतंग उडविण्याचा आनंद घेतला यातून पतंग कसा बांधावा, हवेच्या दिशेनुसार कशा प्रकारे उडवावा व धाग्याला ढील कशी द्यावी याचा अनुभव विद्यार्थ्यानी घेतला .

ऋतुमानानुसार होण्याऱ्या बदलांची ओळख करून देण्यासाठी विद्यालयात शेकोटीचे आयोजन करण्यात आले .विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध गुणदर्शन  कार्यक्रम सादर केले . पालकांच्या हस्ते शेकोटी प्रज्वलित करण्यात  आली .  विद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी पालक व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला . विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने पंचोकाशातील  अन्नमय , प्राणमय , मनोमय , विज्ञानमय व आनंदमय या पाचही अंगाने फुलून येण्यासाठी विद्यालययात  शेकोटी सारखे अनेक उपक्रम घेतले जातात .

https://photos.app.goo.gl/pTrbC39zuL37QXGe7

 

 

 

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’