२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

म.ए.सो.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
पनवेल दि. शुक्रवार .दि २६ जानेवारी २०२३ रोजी विद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक सोहळा पार पडला.विद्यालयाच्या परंपरेनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. त्यानुसार श्री. व सौ. पवार. कु. प्रतीक्षा संभाजी पवार (शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३). या प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनीच्या पालकांना यावर्षीच्या ध्वजारोहण समारंभास आमंत्रित करण्यात आले . यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातआले.विद्यालयाच्या माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ समिता सोमण यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील तसेच इतर बाह्य परिक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिना विषयी भाषण केले.
७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फडके विद्यालयातील विदयार्थ्यांनी टिपरी ड्रिल, पॉम् पॉम् ड्रिल ,टाळ मृदुंग नृत्य, घुंगर काठी इ. शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. विद्यालयाच्या सर्व विभागाचे पदाधिकारी,( सौ समिता सोमण ,सौ निशा देवरे , सौ मनिषा महाजन .सौ. शितल साळुंखे, श्रीमती नमिता जोशी)मराठी व इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी इत्यादींनी उपस्थितीत राहून ध्वजास मानवंदना दिली.

https://photos.app.goo.gl/vfVn48K2xMFicZXN6

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’