आषाढी एकादशी (पूर्व प्राथमिक विभाग)

|| टाळ वाजे ,मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||
|| जय राम कृष्ण हरी||
विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व कळावे या उद्देशाने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दिनांक 16 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली… मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी विठुरायाच्या पालखीचे पूजन केले व तृप्ती मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व व छान गोष्ट सांगितली. त्यानंतर मोठा शिशु, सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी माऊली माऊली या गाण्यावर नृत्य केले. तर दुसरीकडे छोट्या शिशूच्या विद्यार्थी विठ्ठल व रुक्मिणी पोशाखात मनमोहक दिसत होते.. नर्सरी आणि खेळवाडी चे विद्यार्थी मुक्ताई ,ज्ञानेश्वर माऊली ,तुकाराम असे पोशाख परिधान केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी दिंडी भोवती फेर धरला व ज्ञानोबा माऊली तुकाराम असे जयघोष करत टाळ वाजवत गोल फिरत होते.. विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून पौष्टिक असा राजगिरा लाडू देण्यात आला. अशा प्रकारे शाळेच्या सभागृहात छोटेसे पंढरपूर अवतरले.

https://photos.app.goo.gl/QaiiWU5aoPy57yR17

Leave a Comment