‘कलाकार आपल्या भेटीला’.

शनिवार दिनांक ९ जुलै २०२३रोजी सकाळ वृत्तपत्रातर्फे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी “स्कॉलर प्रश्नमंजुषा २०२३” हे नावीन्यपूर्ण सदर सुरू करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना या विशेष सदराचे महत्त्व सांगण्यासाठी विद्यालयात सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्री. संतोष जुवेकर उपस्थित होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व आपली वाचन कला वाढवावी असे आवाहन श्री. संतोष जुवेकर यांनी केले. याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मन मोकळेपणाने उत्तरे दिली.” मी स्वतःही मराठी माध्यमातून शिकलेलो आहे” आणि याचा मला अभिमान आहे असे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या शालेय जीवनातील गमती जमती सिनेसृष्टीतील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. “तुमच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांना मला पुन्हा भेटायला आवडेल” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना श्री. संतोष जुवेकर यांनी विद्यालयाला भेट दिल्याचा विशेष आनंद  त्यांनी व्यक्त केला. विद्यालयाच्या माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका मा. समिता सोमण यांनी श्री. संतोष जुवेकर यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन स्वागत केले. विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

https://photos.app.goo.gl/5geKhPEvVoECMMbNA

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’