म. ए.सो.
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय ,नवीन पनवेल
मराठी माध्यम प्राथमिक विभाग शैक्षणिक वर्ष २०२३-२४
पर्यावरणपूरक किल्ले बनविणे स्पर्धा
जो इतिहासाचे वाचन करतो तोच इतिहास घडवू शकतो अशी महान व्यक्तींनी केलेले वक्तव्य आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये ताठ मानेने उभे असलेले अनेक दुर्ग आजही इतिहासाची ग्वाही देत उभे आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वास्तू व वस्तूंचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्याना रौप्य महोत्सवी विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक किल्ले बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
मंगळवार दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध किल्ले बांधले. सदर स्पर्धेत शिक्षक व मुख्याध्यापक यांनी केलेल्या नियोजनानुसार सर्व इयत्ता ३री व ४ थीच्या विद्यार्थ्यांचे दोन्ही इयत्तांचे मिश्र असे एकूण ११ गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटाला किल्ल्यांची नावे देण्यात आली. प्रत्येक गटांमध्ये १५ ते २० विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रत्येक गटासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षकांनी गटप्रमुखांची नेमणूक केली तसेच किल्ले बांधण्याची रूपरेषा सांगितली. विद्यालयाने आव्हान केल्याप्रमाणे पालकांनी या स्पर्धेत उस्पुर्त सहभाग घेतला. सर्व विद्यार्थी सकाळी ७:०० वाजता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सज्ज झाले होते. पालक प्रतिनिधींच्या हस्ते किल्ले बनविणे स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी, पालक शिक्षक या किल्ले बनविण्याच्या स्पर्धेमध्ये मग्न झालेले होते. उन्हातान्हाची तमा न बाळगता सर्व विद्यार्थ्यांनी किल्ले बांधण्याचा आनंद घेतला.
सभागृहात सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी किल्ले संवर्धन विभागाचे प्रमुख राजे शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पनवेल विभागाचे कार्यकर्ते माननीय श्री संजय धर्माजी पाटील तसेच आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका माननीय श्रीमती रचना विश्वनाथ पाटील या परीक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. परीक्षकांनी सर्व किल्ल्यांचे परीक्षण केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी न डगमगता आत्मविश्वासपूर्वक सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सर्व विद्यार्थी उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाले होते.
विद्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज व देवी सरस्वतीचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. गाणं वृंदाने ईशस्तवन, स्वागत गीत सादर केले. महाराष्ट्र गीतासाठी सर्व उपस्थित सावधान स्थितीत उभे होते. सदर कार्यक्रमात पाहुण्यांसह पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जोशी मॅडम व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोमन मॅडम उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे सर्व पालक प्रतिनिधी व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापकांच्या हस्ते परीक्षकांना पुस्तक, किचैन व तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांडपिळे यांनी केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व आदर्श माता जिजाबाई यांची वेशभूषा केलेली होती.या वेशभूषेत व्यासपीठावर विराजमान झाले होते. इयत्ता १लीच्या विद्यार्थ्यांने पोवाडा सादर केला त्याचप्रमाणे शिवगर्जनाही त्याच जोशात करण्यात आली . परीक्षकांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत स्पर्धेचा निकाल जाहीर करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन कौतुक केले. शिवगर्जना देत कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात झाली.
कार्यक्रमाचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करावी