शुक्रवार दिनांक ३० जून रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. अपर्णा ताम्हणकर (सामाजिक कार्यकर्त्या) यांनी आपल्या भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या “शालेय शिक्षण ही सर्व विषयांची तोंड ओळख आहे” आपला मुद्दा स्पष्ट करून मा. ताम्हणकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सध्याच्या अनेक क्षेत्रांबाबत माहिती दिली चॅट जीपीटीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ही आपली शक्ती आहे यावर त्यांनी आपले मत नोंदवले. यावेळी व्यासपीठावर माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समीता सोमण, माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनीषा महाजन, प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निशा देवरे व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता जोशी उपस्थित होत्या. या व्यासपीठावरून माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेल्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमधील गुणवंतांना सन्मानित करण्यात आले. मनीषा महाजन यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोहळा समारोपाच्यावेळी समिता सोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बापट यांनी केले.
https://photos.app.goo.gl/rMDGf4pxctMPmU3X6