गुरुपोर्णिमा – मातृपितृ पूजन सोहळा

                        माता व पिता यांना गुरुस्थांनी ठेवून त्यांच्या प्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी   दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी विद्यालयात  गुरुपोर्णिमेनिमित्त मातृ पितृ पूजनाचा सोहळा संपन्न झाला . मुख्याध्यापिका सौ. निशा देवरे व त्याच प्रमाणे इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व वर्गाच्या पालाकाप्रतीनिधींच्या हस्ते गुरुवर्य  महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका यांनी केले .विद्यालयातील बालचमू गाणवृंदाने ईशस्तवन , स्वागत गीत व गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे गीत सदर केले . सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या माता व पित्याचे औक्षण केले तसेच विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित शुभेच्छा पत्र पालकांना देवून त्यांना वंदन केले . सर्व पालकांनी उस्पुर्त बोलका प्रतिसाद दिला .

https://photos.app.goo.gl/2kiKgXg3MopnceLU9

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’