सोमवार ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण व उपस्थित पालक प्रतिनिधींच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या संगीत शिक्षिका सौ.वर्षा सहस्त्रबुद्धे यांनी गुरु महिमा वर्णन करणाऱ्या गीताचे सुमधुर आवाजात गायन केले. इयत्ता नववी कणाद मधील रिद्धी पाटील ने गुरुपौर्णिमा याविषयी माहिती सांगितली, तसेच इयत्ता नववी कणाद मधील कुमारी भार्गवी जोशी हिने विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरेवर आधारित सुंदर बोधपर गोष्ट सांगितली. मुख्याध्यापिका सोमण मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आपल्या आयुष्यात गुरुला असणाऱ्या अनन्यसाधारण महत्त्वा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ तर्फे विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल चे वाटप करण्यात आले. शाळा मातेस गुरुस्थानी मानून विद्यार्थ्यांनी तुळशीचे रोप भेट दिले. या तुळशीच्या रोपांच्या माध्यमातून शालेय परिसरात ऑक्सिजन हब तयार करण्यात येणार आहे. सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पूर्व प्राथमिक विभागात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मातृ पितृ पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महर्षी व्यास मुनींच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती नमिता जोशी यांनी केले. सहाय्यक शिक्षिका सौ. जान्हवी कांडपिळे यांनी विद्यार्थ्यांना बोधपर कथा सांगितली. मुलांनी पालकांना औक्षण करून त्यांना नमस्कार करून पूजन केले. पालकांनी मुलांना जवळ घेऊन शुभाशीर्वाद दिले.
https://photos.app.goo.gl/5sRdcaUS4TbW5UYv5