गुरुपौर्णिमा पूर्व प्राथमिक विभाग

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मैश्री गुरुवे नमः
विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्यासाठी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दिनांक : २२/७/२०२४ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी गुरुवर्य महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांकडून श्लोक व प्रार्थना म्हणून घेतली. सहा.शिक्षिका सोनाली मॅडम यांनी विद्यार्थ्यांना “आरूणी ची गुरु भक्ती” ही गोष्ट सांगितली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून , विद्यार्थ्यांनी आपल्या परंपरेचे पालन करावे, त्यांच्या नैतिक मूल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात मातृ-पितृ पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे औक्षण केले आणि त्यांना नमस्कार केला. आई-वडिलांनीही विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले.

https://photos.app.goo.gl/1S2JaUs3irY7yEix9

Leave a Comment

Annual Cultural Event _2024-25 English medium

Theme – ”मनोहरम’ – The Leela of Lord Krishna’