गोकुळाष्टमी ६/०९/२०२३
भगवान विष्णुने धर्माचे रक्षण करण्याकरिता ज्या दिवशी श्रीकृष्ण रुपात अवतार घेतला तो दिवस म्हणजेच गोकुळाष्टमी होय. दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमीनिमित्त सर्व लहान मुले, मोठी माणसे एकत्र येऊन गोविंदा आला रे आला असे म्हणत नाचत आनंदाने दहीहंडी फोडतात.
या दिवसाचे महत्त्व लहान मुलांना समजावे यासाठी आपल्या विद्यालयात दहीहंडी उपक्रम साजरा करण्यात आला. मोठ्या जाड दोरीला काकड्या, केळी,फुगे बांधून मधोमध हंडी बांधण्यात आली. हंडीमध्ये पोहे दही घालून त्यावर आंब्याचे पाने ठेवून नारळ ठेवण्यात आला. माननीय मुख्याध्यापिका जोशी मॅडम आणि छोट्या गोपाळ कृष्णांनी हंडीचे पूजन केले. सौ अंकिता मॅडम यांनी मुलांना माहिती व गोष्ट सांगितली. काही मुले व मुली कृष्ण राधा बनून आले होते. नंतर या मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून दहीहंडी फोडण्यात आली.
अशा तऱ्हेने दहीहंडीचा उपक्रम मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.
https://photos.app.goo.gl/YgeNxA5U4UFYYhGWA