गोपाळकाला [ खेळ दहीहंडी ]

 गोपाळकाला
दिनांक ६ सप्टेंबर २०२३

                                                                     हातात हात गुंफूया
                                                               खेळाची दहीहंडी फोडूया !!
विद्यार्थ्यांमध्ये बंधूभाव, प्रेम, सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी गोपाळकाला निमित्त अशा या आगळ्यावेगळ्या खेलदहीहंडीचे आयोजन करण्यात आले. सर्व शिक्षकांनी दहीहंडी सजवून ती वर बांधण्यात आली या दहीहंडीमध्ये पोह्यांसोबत खेळांचा खाऊ ठेवला होता.
प्रगतीपथाकडे झेप घेताना नवीन तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांमध्ये पारंपारिक खेळांची ओळख करून देण्यासाठी या हंडीमध्ये पारंपरिक देशी खेळांची नावे लिहून त्याच्या चिठ्ठ्या ठेवल्या गेल्या. सर्व विद्यार्थी राधा व कृष्ण या वेशभूषेत नटून थटून आलेले होते. विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ कांडपिळे मॅडम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले . सर्व बालगोपाळांनी या हंडीभोवती फेर धरला व आनंदमय नृत्याचा आस्वाद घेतला त्यानंतर सर्व बाळकृष्ण यांना एकत्रित करून ही हंडी फोडण्यात आली. हंडी फोडल्यानंतर हंडीतून निघालेल्या सर्व खेळांच्या नावांच्या चिठ्ठ्या विद्यार्थ्यांनी उचलल्या व प्रत्येक खेळाच्या नावाचे वाचन करण्यात आले . अशा प्रकारे आनंदमय वातावरणामध्ये खेल दहीहंडी साजरी करण्यात आली.

https://photos.app.goo.gl/FHYfAQiBrUB8zWdu8

Leave a Comment