जागतिक योगदिन
म.ए.सो. आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, व दै. सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी विद्यालयात मोठ्या उत्साहात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्यात आला .याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबाबत जागृकता निर्माण करण्यात आली. प्राचीन योग विद्येचे महत्व प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मा. देविदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
तसेच योगासनांची प्रात्यक्षिके विद्यालयाचे क्रीडा शिक्षिका सौ. विजया जाधव यांनी सादर केली.
मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मराठी माध्यम- माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण यांनी केले . व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. निशा देवरे यांनी केले.योग मंत्रांच्या उच्चाराने प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली. ताडासन,भद्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, यासारखी विविध आसने विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. आभार प्रदर्शन करून सत्राची सांगता करण्यात आली.