दिनांक १४जुलै रोजी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी इनरव्हील क्लब पनवेलच्या वतीने ‘जाणीव स्पर्शाची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाबाबत मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी पनवेल मधील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. समिधा गांधी उपस्थित होत्या. “लहान मुलींना केला जाणारा असुरक्षित स्पर्श ही समाजाची विकृत मानसिकता आहे” याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी स्पर्शाचे प्रकार स्पष्ट केले. स्वसंरक्षणासाठी मोबाईल सारख्या संयंत्रणाचा वापर कसा करावा, अनोळखी व्यक्तीबाबत घ्यावयाची दक्षता, संरक्षणात्मक पवित्रा, संकटसमयी करावयाचा प्राथमिक हल्ला याबाबत मार्गदर्शन केले. चाइल्ड हेल्पलाइन द्वारे प्रसारित कोमल फिल्म दाखवण्यात आली. भाषणांनंतर त्यांनी मुलींच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सदर कार्यक्रमासाठी इनर व्हील क्लब पनवेलच्या प्रेसिडेंट संयोगिता बापट, ट्रेझरर अंजली कुलकर्णी, एडिटर सुलभा निंबाळकर, सदस्य अवंतिका मारुलकर उपस्थित होत्या. संयोगिता बापट यांनी डॉक्टर समिधा गांधी यांना भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली. सुलभा निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी सूत्रसंचालन केले.