||दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडळे मोती हार||
या श्लोकाचे पठण मुले रोजच घरी करत असतात.आपल्या संस्कृतीची महानता ,मांगल्य विद्यार्थ्यांना बाल अवस्थेत रुजविण्यासाठी शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी दीप अमावास्या साजरी करण्यात आली.या निमित्ताने विविध प्रकारांचे दिवे सुबक पद्धतीने मांडण्यात आले. मा मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी दिव्याचे पूजन केले व विद्यार्थ्यांकडून श्लोक म्हणून घेतला. जान्हवी मॅडम यांनी विर्द्यार्थांना दिव्यांची माहिती सांगितली.रंगबेरंगी दिव्यांची सजावट आणि सुरेख मांडणी पाहायला पालक वर्ग ही उपस्थित होता.दिव्यांमुळे उत्साहाच्या सौंदर्यात भरपडली.अज्ञानाचाअंधार नाहीसा करून सर्वत्र प्रकाश पसरावाअशी प्रार्थना करत दीप अमावस्या प्रकल्प पार पडला.