नागपंचमी
आपल्या हिंदू संस्कृतीत सण उत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. फार पूर्वीपासून नागोबाला देव मानून त्याची पूजा केली जाते. श्रावण सुरू होतास नागपंचमी सण पाहिला येतो. आपल्या हिंदू संस्कृतीत पूर्वीच्या काळापासून प्राण्यांची पूजा केली जाते. दि.२१/०८/२३ रोजी आपल्या पूर्व प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांना नागाचे महत्त्व समजावे यासाठी नागपंचमी हा प्रकल्प मांडण्यात आला. मातीचे वारूळ तयार करण्यात आले, त्या वारुळावर छोटे-मोठे क्ले मातीचे नाग ठेवले, वारुळातून बाहेर आलेल्या नागाची पूजा करताना स्त्रिया दाखविण्यात आल्या होत्या. एका बाजूला गारुडी नागोबाला पुंगी वाजून ढोलवत आहे असे चित्र दाखवण्यात आले. झोपाळ्यावर खेळणाऱ्या मुली, फुगड्या खेळणाऱ्या बायका दाखविण्यात आल्या. मुख्याध्यापिका श्रीमती जोशी मॅडम यांनी पूजा केली, सौ पाटील मॅडम यांनी नागपंचमीची गोष्ट मुलांना सांगितली. नंतर सहशिक्षकांनी हळदीकुंकू वाहून पूजा केली, अशाप्रकारे सहशिक्षिका व सेविका यांच्या सहकार्याने हा प्रकल्प उत्तम रित्या पार पडला.