पावसाळा प्रकल्प ४/८/२०२३.
“येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा”.
हे गाणे म्हणजे चिमुकल्यांच्या फार आवडीचे. त्यांचा हाच आनंद द्विगुणीत करण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागात पावसाळा प्रकल्प मांडण्यात आला. या प्रकल्पामध्ये धबधबा, इंद्रधनुष्य, झाडे,विहीर,शेत व शेतात काम करताना शेतकरी,पाण्यात मासे, पाण्यात होड्या सोडताना मुले दाखवण्यात आली. तसेच बेडूक, साप असे प्राणी दाखविण्यात आले. या प्रकल्पाची माहिती प्रत्येक वर्गात वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितली. हा प्रकल्प शिक्षक व सेविका यांच्या सहकार्याने पार पडला.