विद्यार्थी प्रवेशोत्सव
उद्दिष्ट:- विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मियता, विश्वास व आस्था निर्माण व्हावी तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी सज्ज होणे.
अहवाल
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभासाठी तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी विद्यालयात ढोल, ताशा व संगीताच्या गजरात फुलांचा वर्षाव करीत मुख्याध्यापिका माननीय निशा देवरे यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून स्वागत करण्यात आले.
प्रत्येक वर्ग शिक्षकांनी देखील आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे कुमकुम तिलक लावून औक्षण केले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेली सर्व पाठ्यपुस्तके दिली गेली तसेच प्रवेश दिनाची सुरुवात ही मिष्टान्न व शेंगदाणे गुळयुक्त खाऊचे वाटप करण्यात आले . सकाळ तर्फे वर्तमानपत्राचे वाटप करण्यात आले .प्रत्येक वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला . वर्गनिहाय मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले अशा प्रकारे उल्हासमय वातावरणात विद्यार्थी प्रवेशोत्सव संपन्न झाला.