सक्षम नारी, सुरक्षित नारी’ या विषयावर व्याख्यान
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सोमवार, दि.८ मार्च २०२१ रोजी आपल्या विद्यालयात पनवेलमधील खांदा कॉलनीतील पोलीस स्टेशनमधील पोलिस प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘सक्षम नारी, सुरक्षित नारी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांनी पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ, महिला पोलीस हवालदार हर्षला पाटील, धनवे, पोलीस अंमलदार अलिफ बेग व शिवसेनेच्या उपमहानगर संघटिका सौ. मंदा जंगले यांचे स्वागत केले.
यावेळी किरण वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन शिक्षण घेत असताना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहाण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. सुरक्षित व सावध वातावरणासाठी विद्यार्थ्यांनी काय करावे याबाबत मंदा जंगले व धनवे यांनी माहिती दिली.
विद्यालयात कार्यरत असलेल्या ‘निर्भया समिती’मधील कायदेशीर सल्लागार अॅड. शुभांगी शेलार यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
‘निर्भया समिती’च्या शिक्षक सदस्या असलेल्या सहाय्यक शिक्षिका रचना पाटील यांनी सुरक्षित शैक्षणिक वातावरणासाठी विद्यालयातील निर्भया समितीमार्फत सुरू असलेल्या कार्याची माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी केले.