“` म.ए.सो.
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभाग
शैक्षणिक वर्ष – २०२३-२४
सामाजिक भोंडला
दि.१८ ऑक्टोबर २०२३
विद्यार्थी हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याच्या प्रगतीमध्ये उद्याचा सामाजिक विकास हा घडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, प्रेम निर्माण करण्यासाठी शारदोत्सवनिमित्त सामाजिक भोंडलाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सर्व महिला पालकांना आमंत्रित करण्यात आले. यश व समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या तसेच हत्ती नक्षत्राचे स्वागत करण्यासाठी हत्तीचे पूजन मुख्याध्यापिका निशा देवरे व तसेच सर्व पालक प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले .
घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत वर्गनिहाय देवी शारदेचे पूजन करण्यात आले. असे म्हटले जाते की,’ जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगउद्धारी ‘याच उक्तीनुसार जगाचा उद्धार करणाऱ्या तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सर्व महिलांचे या रौप्य महोत्सवी वर्षी वाचनाचा खजिना स्नेहभेट देऊन कौतुक करण्यात आले. यात डॉक्टर, परिचारिका, वकील, पोलीस, समाजसेविका, शिक्षिका, उद्योजिका, रिक्षाचालिका, गृहिणी यांचा समावेश होता.
मोठ्या व्यक्तींमध्ये व्यक्तींमध्ये लपलेले लहान मुल बाहेर शोधून काढण्यासाठी विद्यालयातर्फे विविध मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. सर्व महिला पालकांनी या खेळाचा आनंद घेतला. तसेच भोंडल्यांच्या गाण्यांवर फेर धरून मनमुराद आनंद घेत नृत्यात सहभागी झाले.
विद्यालयातर्फे सर्व महिला पालकांना खाऊ देण्यात आला तसेच महिला पालकांनी देखील खिरापत आणून त्याचे वाटप करण्यात आले. पालकांनी विद्यालयातील अशाच नवनवीन उपक्रमांसाठी आनंदमय बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. अशाप्रकारे उल्हासमय वातावरणात महिला पालकांचा भोंडला संपन्न झाला.
https://photos.app.goo.gl/UX9Atqn3rKqRgv3R9