दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने २ ते ४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या *’स्कूल संसद’* या उपक्रमात सहभागी म ए सो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या इ. ८ वी मधील वैष्णवी गोरडे, वेदांगी करंदीकर व इ.९ वी मधील प्रांजली सरक या सहभागी विद्यार्थिनींच्या *’विझडम इंडिया ‘* या पक्षाला तृतीय आदर्श पक्ष म्हणून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून प्राथमिक फेरी पूर्ण करून अंतिम फेरी दाखल झालेल्या ५० शाळांमधील १५० विद्यार्थी यात सहभागी झाले होते. नवीन पिढीला भारतीय लोकशाहीतील संसदीय पद्धतीची प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळावी यासाठी गेली ११ वर्षे दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत आहे. या तिघींनाही मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील सहायक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी उपक्रमाबाबत अधिक माहिती सांगताना, पक्ष म्हणून दिलेला विषय प्रधानमंत्री व कॅबिनेट मंत्री या नात्याने विद्यार्थ्यांनी भारतापुढील अनेक समस्यांवर उपाय सुचवल्याचे सांगितले.. यशस्वी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणाऱ्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले आहे.
विद्यार्थिनींनी स्कूल संसद उपक्रमात, ‘खाजगी संस्थांमधील नोटीस कालावधी’ व ‘गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय ‘ या दोन विषयांवरआपले संशोधनात्मक विचार मांडले होते.