२६जानेवारी प्रजासत्ताक दिन

वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. २६ जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. जो भारताचा राष्ट्रीय सण आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातही ७४वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार इयत्ता दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना ध्वजारोहणाचा सन्मान दिला जातो. त्यानुसार श्री. व सौ. सहस्त्रबुद्धे (२०१९-२०) सौ. भट (२०२०-२१) आणि श्री. व सौ. देशपांडे (२०२१-२२) यांना आमंत्रित करण्यात आले होते. कोविड निर्बंधांमुळे मागील दोन वर्ष पालकांना बोलवता आले नव्हते. त्यामुळे त्यांना यावर्षीच्या कार्यक्रमाकरिता आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना, “शाळेतील संस्कार, शिस्त आमच्या मुलांमध्ये बिंबवल्या बद्दल शाळेचे आभर मानले तसेच राष्ट्र घडविण्याकरिता शाळा या घटकाचा मोलाचा वाटा असून फडके विद्यालयात नेहमीच विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रभक्ती पुढील पिढीत रुजविण्याचे काम केले जाते.” असे अतिथी श्री. देशपांडे यांनी शाळेबद्दल बोलताना सांगितले. यावेळी शिष्यवृत्ती तसेच इतर परिक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
७४व्या प्रजास्त्तक दिनानिमित्त फडके विद्यालयातील विदयार्थ्यांनी लाठी-काठी, डंबेल ड्रिल, एरोबिकस्, सूर्यनमस्कार इ. शारीरिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. कार्यक्रमाला शाळेतील मराठी व इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी इत्यादींनी उपस्थिती नोंदविली.

Leave a Comment