सामाजिक भोंडला
शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी विद्यालयात शारदोत्सव निमित्त सामाजिक भोंडलाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सर्व पालक प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले. यश व समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या तसेच हत्ती नक्षत्राचे स्वागत करण्यासाठी हत्तीचे पूजन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण व तसेच सर्व पालक प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत वर्गनिहाय देवी शारदेचे पूजन करण्यात आले. …