बाल मेळावा
फडके विद्यालयात बालमेळाव्याचे आयोजन नवीन पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्याला वाव मिळावा, तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींची जाणीव व्हावी या हेतूने विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये शनिवार,दि.१६ मार्च २०२४ रोजी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सोनी मराठी वाहिनीवरील …