मराठी भाषा गौरव दिन

     सोमवार दिनांक २७/०२/२०२३ रोजी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले. सदर दिवशी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ देवरे मॅडम व पारंपारिक पोशाखात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा व विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ. मधुरा कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सहा. शिक्षिका सौ सावंत यांनी कुसुमाग्रजांनी  विद्यार्थ्यांना माहिती सांगितली त्याचप्रमाणे काव्य वाचन केले. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

This will close in 20 seconds

Scroll to Top