बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी विद्यालयाने ज्ञानदानाची २४ वर्षे पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले यानिमित्ताने संपूर्ण शाळा सुरेख रांगोळ्यांनी, फुलांच्या माळांनी, फुग्यांनी सुशोभित करण्यात आली. विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेचे औक्षण केले. शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने व विद्यार्थ्यांची भूमिका तसेच योगाचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मा. देविदास पाटील व्याख्याते म्हणून लाभले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत, म. ए.सो. गीताने करण्यात आली. विद्यालयाची २४ वर्षाची प्रदीर्घ वाटचाल दर्शवणारी पी.पी.टी. विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. समिता सोमण मॅडम यांनी केली २४ वर्षांचा शाळेचा आठवणीचा पट सर्वांसमोर त्यांनी उघडला. प्रमुख पाहुणे मा. देविदास पाटील यांनी आपल्या व्याख्यानात “शिक्षण म्हणजे विचार, शिक्षण म्हणजे आचार व शिक्षण म्हणजे संस्कार” तसेच ध्यानधारणा, सकस आहार, योगाचे महत्त्व इत्यादी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. बापट यांनी केले. सहाय्यक शिक्षिका सौ. इनामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्राथमिक विभागात-प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मा. सौ. निशा देवरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन योगाचे महत्त्व पटवून दिले. २४वर्षाची प्रदीर्घ वाटचाल दर्शवणारी पी.पी.टी. विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.