विद्यालयाचा २५वा वर्धापन दिन
बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी विद्यालयाने ज्ञानदानाची २४ वर्षे पूर्ण करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले यानिमित्ताने संपूर्ण शाळा सुरेख रांगोळ्यांनी, फुलांच्या माळांनी, फुग्यांनी सुशोभित करण्यात आली. विद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेचे औक्षण केले. शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने व विद्यार्थ्यांची भूमिका तसेच योगाचे महत्त्व …