१५ जून शाळा प्रवेशोत्सव
गुरुवार दिनांक १५जून रोजी शैक्षणिक वर्ष २०२३- २४ चा शुभारंभ व नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळामातेस रांगोळी, फुलांनी तसेच फुग्यांनी सजवण्यात आले. स्वागताचे फलक लिहिले आणि ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रार्थनेच्या वेळी विद्यालयाच्या सभागृहात इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी …