आषाढी एकादशी

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक सण आहे. या दिवसाचे औचित्य साधून पूर्व प्राथमिक विभागात दिनांक २०२४/७/२०२६ रोजी आनंददायी आणि संस्कार मूल्य जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित राहिले होते; त्यानंतर माननीय मुख्याध्यापिका नमिता जोशी मॅडम यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सहाय्यक शिक्षिका जान्हवी मॅडम यांनी आषाढी एकादशीची, सर्व विद्यार्थ्यांना छानशी छोटीशी गोष्ट सांगितली. खेळवाडीच्या छोट्या विद्यार्थिनींनी विठ्ठल रखुमाईच्या पालखी समोर ताल धरून दंग झाल्या तसेच मोठ्या शिशुच्या विद्यार्थिनीने छानसा अभंग म्हटला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी “ज्ञानोबा-तुकाराम” च्या गजराने वातावरण भक्तीमय केले. त्यानंतर टाळाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. अशा प्रकारे सर्व शिक्षक-सेविका व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन हा सांस्कृतिक कार्यक्रम आनंदात साजरा केला.

Scroll to Top