शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२६ रोजी सर्व प्राथमिक विभागात पावसाळा प्रकल्प मांडण्यात आला. या प्रकल्पामध्ये पावसाळ्यातील निसर्गाचे सुंदर स्वरूप आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आले. कापसाचा वापर करून धबधबा तयार करण्यात आला होता. तसेच घर, शेती, शेतीची अवजारे, चिखलात खेळणारी मुले, झाडे, इंद्रधनुष्य, छत्री, पक्षी, प्राणी, आड, विहीर यांचे देखावे साकारण्यात आले होते.
याशिवाय परिचारिका, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर व त्यांच्या साहित्याचे कटआउट्स मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कागदी होड्याही या प्रकल्पात प्रदर्शित करण्यात आल्या होत्या.
अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना हा पावसाळा प्रकल्प दाखविण्यात आला. वर्गशिक्षकांनी प्रकल्पातील प्रत्येक घटकाची माहिती समजावून सांगून पावसाळ्याचे महत्त्व, निसर्गातील बदल आणि आरोग्याची काळजी यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.





